Message # 439843

केसाला कलप लावून
उगा शाईन करू नये
पोरासोरांसारखं ,
व्हॅलेंटाइन व्हॅलेंटाइन करत फिरू नये

पोरं काका म्हणू लागले, की
आपण भानावर यावं
सुटलेलं पोट कमी करायचं
थोडसं मनावर घ्यावं

मात्र , काही केलं तरी
पोट कमी होत नाही
जॉगिंग आणि जिमसाठी
शरीर साथ देत नाही

ओठावरच्या मिशीमधले
लपत नाही पांढरे केस
आपण आता काकाच दिसतो
कोणताही घाला ड्रेस

जिथं कॉटरने मुंग्या येत नाही
उगा वाईन हाती धरू नये
पोरासोरांसारखं
व्हॅलेंटाइन व्हॅलेंटाइन करत फिरू नये

फारच वाटलं तर
बायकोलाच म्हणावं
तूच माझी व्हॅलेंटाइन

तिला सुद्धा आश्चर्या होईल
सूर्य कुणीकडून उगवला पाहिल
हळूच लाजून म्हणेल
ईश्श... तुमचं आपलं काहीतरी..
मग आपणही म्हणावं
सरकार ! तुम्ही आहातच तेवढ्या भारी
असं गोड गोड वागावं
छान छान जगावं
अर्थ आणि परमार्थ
हेच असावं ध्येय

उनाडक्या करायचं
निघून गेलं वय
डोळ्यांचा नंबर वाढलाय
उगा लाईन मारण्याचं काम करू नये
पोरासोरांसारखं
व्हॅलेंटाइन व्हॅलेंटाइन करत फिरू नये
😉😉😉😉

BACK TO TOP