मराठी (5235)

नवऱ्याला मुठीत ठेवण्यापेक्षा


नवऱ्याचं *मुठीत* ठेवा नवरा आपोआप मुठीत राहील...
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

 
62
 
a day
 
User16052

ख्रिस गेल वर चिअर्स गर्ल्स नाराज 😔

नाचून नाचून चड्या ओल्या झाल्या


दरवर्षी उन्हाळ्यात नाचायला लावतो हा काळ्या🤣...
😂😂

 
68
 
2 days
 
MUMBHAI !!!

घरी जाताना व्हाट्सअप पाहत जात होतो. शेजारच्या घरात कधी गेलो कळलेच नाही.
आणि आश्चर्य म्हणजे,


त्या घरातील बाईने चहा आणून दिला,सिरीयल च्या नादात त्यांना पण कळले नाही।😀😀😀
😂😂🤦‍♀🤦‍♀😂😂
पुढे... कथा....

मी चहा पीत असताना तीचा नवरा आला घरात आणि मी दीसताच सॉरी घर चुकले म्हणून बाहेर निघुन गेला ..Facebook च्या नादात.

...😄😄😂🤣🤣🙃😁😆😂🤣

 
32
 
2 days
 
Just4u

जेवढा राग *गर्लफ्रेंडने धोका* दिल्यावर नाही येत, तेवढा राग
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
४० रुपयाचं *कलींगड🍉पांढरं निघाल्यावर* येतो...😠😠😡

आणि त्यात घरची मंडळी म्हणते
*"कळत नाय तर आणतय कशाला?*

असं म्हटल्यावर तर खूपच...
😢😢😢

उन्हाळा प्रारंभाच्या शुभेच्छा...

😝.!!!😜

 
41
 
2 days
 
Just4u

*सासू सूनेचे भांडण*

सासू:: *चागले नऊ महिने पोटात वजन*
*सोसले आहे मी माझ्या लेकराला*

सून:: *किती कीलोचा होता तेव्हा तो ?*

सासू :: *चागला 3 किलोचा होता.*

सून :: *आत्ता 80 किलोचा झालाय, रोज*
*सोसते मी आणि हुं का चु नाही*
*करत*
😂😂😂😂😂

 
43
 
3 days
 
Just4u

बदमाश स्त्रियांना आळा घालून आपली कुटुंब व्यवस्था वाचवायची असेल तर प्रत्येक पुरूषाने हे जरूर वाचावे....*

पंचेचाळीशितल्या एका तरुणाच्या "पत्नीचा" आकस्मिक मृत्यु होतो.

बर्याच लोकांनी त्याला दूसर्या लग्नाचा सल्ला दिला परंतु *"माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रुपात एक सुंदर भेट दिली आहे, त्याच्या पालन पोषणातच माझे ऊर्वरीत आयुष्य व्यतीत करेन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन"* असे म्हणत त्याने ते प्रकर्षाने टाळले.

बघता बघता दिवस, महीने वर्षे निघून गेली. मुलगा मोठा झाला. आता पितापुत्र दोघे मिळून व्यवसाय करु लागले. मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून याने आपली सारा व्यवसाय, संपत्ती, जमीन, जुमला सारं काही मुलाच्या नावावर केले.

हे पीता महाशय आता आपल्या मित्रांच्या सोबत कधी त्यांच्या आॅफिस मध्ये, तर कधी मुलाच्या आॅफिस मध्ये असा ईथे तिथे आपला वेळ व्यतीत करु लागले. थोडे दिवसात मुलाचेही लग्न झाले सुंदर सुन घरी आली.आता तर हे महाशय अगदी निश्चिंत झाले.

बघता बघता मुलाच्या लग्नाला एक वर्ष झाले. एके दिवशी हे पीता महाशय घरी दूपारच्या जेवनास बसले. त्याचा मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता. जेवताना यांनी आपल्या सुनेकडे दही मागितले. यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले.

जेवण झाले. हे पीता महाशय हात धुवून दिवानखाण्यात सोफ्यावर बसले. मुलगा अजून जेवत होता. त्याने आपल्या बायकोकडे दही मागितले असता तीने लगेच कपाटातुन दह्याचे भांडे काढून त्याला वाढले व स्वतःलाही वाढून घेतले.

जेवणानंतर मुलगा काही न बोलता आॅफिसला निघून गेला.

दुसर्या दिवशी सकाळी मुलगा आपल्या वडीलांना म्हणाला *"बाबा आज तयार व्हा आपण तुमच्या लग्नाची बोलणी करायला जाणार अहोत"* पीता महाशयांना आपले काय चुकले हे समजेना. सावरत ते मुलाला म्हणाले *"बाळा आता या वयात मला लग्नाची काय गरज आहे? तुला सुद्धा आजपर्यंत मी अगदी प्रेमाने, तुझ्या आईची कोणतीही कमतरता न भासू देता लहानाचा मोठा केला आहे. अर्थातच तुलाही आता दूसर्या आईची गरज नाही"*

यावर मुलगा म्हणाला *"बाबा मला तुमच लग्न करायच आहे ते तुम्हाला दही वाढणारी आणण्यासाठी. ऊद्या पासून मी आणि माझी बायको भाड्याच्या घरात रहायला जातोय आणि त्याचबरोबर मी ऊद्यापासुन तुमची सारी मालमत्ता तुमचा सारा व्यवसाय तुमच्या नावावर करतोय आणि तुमच्या आॅफिसमध्ये एका सामान्य कामगाराप्रमाणे काम करणार आहे. हे असं झाल्याशिवाय एक वाटी दह्याची किंमत माझ्या बायकोला समजणार नाही."*

कथा संकलित आहे परंतु समस्या अगदी गंभिर आहे आणि खरोखरच अशा संयमी आणि गंभिर मुलांची समाजास अत्यंत आवश्यकता आहे.

*मातापित्याचे ऊपकार कधीच फिटणार नाही !*
_____/\_____

 
27
 
3 days
 
Just4u

*हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहित आहे का....??*+++

१) *लग्नात मांडव कशासाठी ???*
= मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे, हे सांगण्यासाठी !!!

२) *विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???*
= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा, हे सांगण्यासाठी !!!

३) *नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???*
=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा, हे सांगण्यासाठी !!!+++

४) *मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???*
= मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे, हे सांगण्यासाठी !!!

५) *लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???*
= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नाही हे सांगण्यासाठी !!!

६) *लग्नात सप्तपदी माहित आहे का कशासाठी???*
= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी !!!+++

७) *लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???*
= तांदूळ ची अक्षता याच्या साठी की तांदूळ चे बीज लावताना आपण एक जागी लावतो ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो तसेच मुलींचे बालपण माहेरी असते त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते तिथेच त्यांचा वंश वाढतो, याची आठवण रहावी म्हणून लग्नात तांदुळाच्या अक्षता टाकतात *पण हे शास्त्र बऱ्याच लोकांना माहीत नाही..
😊😊😊🙂🙂🙂

 
41
 
3 days
 
Just4u

पुणेकर विरुद्ध आंब्याचा व्यापारी

पुणेकर. अडीच डझनची पेटी दाखवा.पण मी पेटी उघडून बघणार.
व्यापारी. बघा साहेब. पण भाव कमी नाही होणार.
पुणेकर. अरे अस्सल रत्नागिरी दिसतोय.
व्यापारी. अरे वा .
पुणेकर मनात म्हणतो. मला कोणीच फसवू शकत नाही. मी आंबे थोडेच बघत होतो. मी पेटीतला कागद बघितला. रत्नागिरीचा स्थानिक वर्तमान पत्राचा कागद होता.
व्यापारी मनात. अरे पुणेकरा मी पण हाडाचा व्यापारी आहे. मी रत्नागिरीहून फक्त रद्दीच मागवतो.
बाकी माल कर्नाटक चा आणतो.
😀😀😀

 
61
 
4 days
 
Just4u

👇वाचा आणि हसा
😡😜😄😝😳😩😭

पुढारी (डाँक्टराना ) : माझ्या
तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला
समजेल अशा भाषेत सांगा.!😫😫😫😄😜

डाँक्टर : आपल्या रिपोर्ट नुसार
रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे..😫😫

फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत..😜😄

ऊजवी कडील किडनीने आपल्या
पदाचा राजीनामा दिला आहे..😄😜😫

चरबी महागाई प्रमाणे वाढत
चालली आहे. त्यामुळे,😄😜

रक्तवाहिन्यां मध्ये रास्तारोको
आंदोलन चालू झालेले आहे..😫😄😜

मज्जासंस्था सुध्दा आपला पाठींबा
काढून घेण्याच्या मार्गावर आहेत..😫😫😄😜

या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील
पक्ष श्रेष्टिंवर पडत आहे. त्यामुळे,

ते आपले सरकार बरखास्त
करण्याच्या तयारीत आहेत.😄😜😫

😭😩😜😝😄😳😂
.🚩🚩🚩🚩🚩😄😜👍💃💃

 
46
 
4 days
 
Just4u

*यंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज*

😛😛😛😛
नवरा ऑफिसात असतांना अकोल्याची काजोलबाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी अमरावतीला जाते.जेंव्हा नवरा पंकज घरी पोहोचतो , त्याला टीवी जवळ एक नोट चिकटवलेली मिळते -
😷
माहेरी जाऊन राह्यली अमरावतीले , पोट्ट्याइले घ्यून. पुढील गोष्टी ध्यानात ठेवजा -
. .

1 - मित्रांना घरी बोलावून घराचा भंगारखाना करू नोका. मागच्या वेळी छबज्यावर 8 रिकाम्या बाटल्या सापडल्या होत्या ....

2 - स्वैपाक एक तर घरीच करा किंवा बाहेर गिळून येत जा , पण बाहेरचे आणून घरांत कुणालेही खाऊ घालू नका, मागच्या वेळी सोफ्या खाली पिज़्ज़ा वाल्याचे बिल सापडले होते .हे माहे घर आहे गजानन महाराज संस्थान नाही .

3 - चश्मा ड्रेसिंग जवळ ठेवजा , मागच्या वेळी फ्रीज मध्ये सापडला होता .

4 - कामावाल्या माधुरीले पगार देऊन जात आहे.
फुकटात दया -माया दाखवायची काहीच गरज नाही.तुमचे सारे चोचले मले माहीत आहेत !

5 - सकायी सकायी उठून शेजाऱ्याना जागवुन पेपर आला कि नाही हे विचारायची काही ही गरज नाही .
आपला पेपरवाला त्यायीच्या पेक्षा वेगळा आहे ...आणि दूधावाला इस्त्रीवाला सुद्धा ...

6 - तुमच्या चड्ड्या अलमारीत खालच्या कप्प्यात आहेत , अन् मुलांच्या वरच्या कप्प्यात . मागच्यासारखं बाल्याची चड्डि घालुन जाऊ नका ...

7 - तुमच्या सगळ्या रिपोर्ट नॉर्मल आहेत .
उठ सुठ त्या लेडी डॉक्टरकडे जायची गरज नाही .

8 - माह्या बहिणीचा व वहिनीचा बड्डे मागच्या महिन्यातच झाला .रात्री बेरात्री त्यायीले फोन करून, उगाच बड्डे विश कराचा चोट्टेपणा करू नका ..

9 - वाय-फायचा पासवर्ड बदलला आहे.मुकाट्याने लवकर झोपत जा...

10 -जास्त हिडगावू नका कि उड्या मारू नका .कारण मानकर बाई , काळे बाई , जोशी बाई , कोल्हे ताई , शिंदे वहिनी , पवार ताई आणि खेडकर ताई सगळ्याच आपापल्या माहेरी जाणार आहेत .

11. साखर , पत्ती , कॉफी मागण्याच्या बहाण्याने त्या काळतोंडी करिश्माच्या घरी जाण्याचा विचार सुद्धा करू नका ! मी सगळ्या वस्तू डबल करून ठेवल्या आहेत ...
आणि सर्वात महत्वाचे .....

12 - जास्त ओव्हरस्मार्ट बनण्याचा प्रयत्न करू नका , अमरावती ते अकोला दीड तासांत पोचता येते .मनांत आलं तेंव्हा , कोणत्याही वक्ती 🕝 परत येऊ तुमच्या उरावर दळण दळू शकते . उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत .... तुमच्या वाला बैलपोळा नाही
👱‍♀

😆😆😆😆😆😝😝😝😝😝😝

 
41
 
4 days
 
User16052
LOADING MORE...
BACK TO TOP